कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे
कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे

कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे

Homeभारत हा शेतीप्रधान देश असून भारताची अर्थ व्यवस्था शेतीमाल उत्पादनावर अवलंबून आहे. जवळ जवळ ७० टक्के लोकसंख्या शेती व्यवसायावर उपजिविका करीत आहेत. शेतकर्‍याने पिकवलेल्या शेतीमालाची विक्री शेतकरी स्वतःच्या इच्छेप्रमाणे करू शकत नव्हता. बाजारातील मध्यस्थ, दलाल, मोठे व्यापारी यांचेकडून हत्ता पद्धतीने,( Sale Under Cover ) गुप्तरितीने शेतीमालाची विक्री होत होती. शेतीमालाचे वजन व्यापार्‍यांच्या इसमा मार्फत करीत होते. त्यामध्ये फसवणूक, घट-तूट, सुटसांड इत्यादी गैर प्रकार होत होते. धर्मादाय व इतर अनिष्ट प्रथा बाजार पेठेत सर्रास चालू होत्या आणि शेतकरी हताश होऊन हे सर्व निमूटपणे सहन करीत होता. यातून शेतकर्‍याला बाहेर काढण्यासाठी बाजार नियमनाखाली आणण्याची आवश्यकता भासू लागली.

भारतामधील पहिली बाजार समिती सन १८८६ साली कारंजालाड येथे स्थापना झाली. ही बाजार समिती कापूस खरेदी - विक्रीच्या नियमनासाठी स्थापना झाली.

Home